जगातील सर्वांत विषारी साप चावला, तरीही घाबरला नाही; ‘या’ माणसाच्या कृतीमुळे सगळेच अवाक्

 


Snake Bite in Bihar : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यान अनेकांचा जीव गेला आहे. तसंच, कोणत्या सापाने दंश केल्याचं हे न कळल्यामुळेही उपचारांअभावी जीव गेल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

 


जगातील सर्वांत विषारी सापांपैकी एक असलेल्या रसेल वाइपरने बिहारमधील भागलपूरमध्ये एका माणसाचा चावा Snake Bite in Bihar घेतला. सर्पदंश झाल्याचं कळताच प्रकाश मंडल या माणसाने विषारी सापाला पकडले आणि गळ्यात टांगून रुग्णालयात घेऊन आला. रुग्णालयात आल्यानंर प्रकाश मंडल याच्यावर आपत्कालीन विभागात तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या मानेभोवत तो साप होताच.तो सरपटणारा प्राणी त्याच्या गळ्यातून निसटला तर तो रुग्णलयातील इतर रुग्णांचा चावा घेईल यामुळे काही लोक त्यांच्यापासून दूर होते. प्रकाश मंडळ याने मानेभोवत साप लटकवून एका हाताने सापाचं तोंड दाबलं होतं. त्यामुळे या व्यक्तीला एका निर्जन स्थळी घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं.

 


तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीने मानेभोवती गुंडाळलेला साप हातात पकडला आणि त्याच्याबरोबरच फरशीवर झोपला. अखेर उपचारांसाठी त्याने सापाला दिलं सोडून सापाला पकडून ठेवल्यास उपचार करण्यास अवघड जाईल, असं त्याला सांगितल्यानंतर त्याने सापाला सोडले. हा साप अत्यंत विषारी वर्गातील होता. भारतापासून तैवान आणि जावापर्यंतच्या खुल्या देशात तो आढळतो. मानवी संपर्क कमी असलेल्या शेतजमिनींमध्ये हे साप आढळतात.

 

Leave a Comment