groom bride viral dance
View this post on Instagram
groom bride viral dance लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
View this post on Instagram
लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा नवरीने आपल्या लग्नाच्या वरातीत तुफान डान्स केला आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओत तुम्हाला लग्नाची वरात सुरु असलेली दिसत आहे. वरातीत घरातील अनेक सदस्य डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण उपस्थित आहे, मात्र व्हिडिओत पुढे पाहिले तर वरातीत नवरा-नवरीसाठी जो रथ असतो त्यावर चढून नवरदेव आणि नवरीबाई जोरदार डान्स करत आहे. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे.डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत.
View this post on Instagram