बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

 


Driver Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बस चालवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक घटना पाहण्यासाठी मिळत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत बस चालवताना बस चालकाला हृदय विकाराचा झटका आलेला आहे.

 


व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सवरील ”@TeluguScribe” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”बस चालवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बस नेलमंगळा येथून यशवंतपूरच्या दिशेने जात होती. बस चालवत असताना चालकाला छातीत दुखू लागले आणि तो बेशुद्ध पडला, त्यानंतर कंडक्टरने ब्रेक लावून बस थांबवली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते” अशी माहिती सांगण्यात आलेली आहे.सध्या सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा होत आहे.

 


मात्र यात बस चालकाचा मृत्यू झालेला आहे. सध्या सर्व घटना नेटकऱ्यांंमध्ये चर्चचा विषय ठरत आहे.व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ बस चालक बस चालवताना दिसत आहे. व्हिडिओत पुढे दिसत आहे की, बस चालक सुरुवातीस व्यवस्थित रित्या बस चालवत आहे. रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा दिसत आहे. मात्र काही वेळात बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण shocking viral video 2024 सुटते आणि बच चालक बसमध्ये कोसळतो. सुदैव्याने बसचा वेग कमी असल्याने आणि कडंक्टक बस चालकाच्या येथे येऊन गाडीचा वेग नियंत्रणात आणून बस थांबवतो. सर्व घटना बसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही Driver Viral Video.

 

Leave a Comment