He’s lucky asf!
pic.twitter.com/Sf80rjucck— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 11, 2024
Accident Viral Video 2024 New : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
He’s lucky asf!
pic.twitter.com/Sf80rjucck— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 11, 2024
तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका व्यक्तीने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.
He’s lucky asf!
pic.twitter.com/Sf80rjucck— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 11, 2024
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळा रस्ता आहे आणि रस्त्यावर भरधाव वेगात वाहनं जात आहेत. यावेळी असाच एक टँकर भरधाव वेगात जात आहे आणि शेजारी एक स्कूटरवाला जात आहे. यावेळी अचानक सरळ जाणारा स्कूटीचालकाचा तोल जातो आणि तो थेट टँकरला धडकतो, ही धडक इतकी जोरात आहे की तो थेट चाकाखाली गेला असता मात्र शेवट पाहून तुम्हाही अवाक् व्हाल. या व्यक्तीचं नशीब इतकं बलवत्तर आहे की टँकरला धडकूनही या व्यक्तीला काहीही होत नाही. तो पुढच्याच क्षणी उठून उभा राहतो.
He’s lucky asf!
pic.twitter.com/Sf80rjucck— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 11, 2024