• वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या माहितीनुसार दिल्लीमधूनदेवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडीत करण्यात आलेले आहे.
  • महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या १३२ आमदार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला २२-२४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदे येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला ४१ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला ८-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली.