डिसेंबर महिन्यात जमा होणार?
एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अस सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे.